कोरेगाव भिमा (तालुका शिरूर)- फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या फ्रेंड्स सेकंडरी स्कूलने यंदाच्या मार्च २०२५ मधील इ. १० वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून, विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. एकूण ९२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते आणि सर्वच विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. संस्थेने सलग १९ वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा अखंड राखली आहे.
प्राप्त माहितीनुसार, यंदा रागिणी कृष्णा अरगडे हिने (९१.८०%) गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. रय्यान इरफान अन्सारी (९१.६०%) दुसऱ्या स्थानी, तर जान्हवी रवींद्र अहिरे (९१.२०%) तिसऱ्या क्रमांकावर राहिली. याशिवाय दिया दिलीप प्रसाद पाठक हिने (८९.६०%) आणि शर्वरी सचिन दळवी हिने ८९.००% गुण मिळवत अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक पटकावला.
शाळेतील ५४ विद्यार्थ्यांनी ७०% पेक्षा अधिक गुण प्राप्त करून गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. या यशामागे मुख्याध्यापिका ज्योती सैंदाने, उपमुख्याध्यापिका अजिताकुमारी व सर्व शिक्षकवृंद यांचे अथक मार्गदर्शन लाभले असल्याचे विद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
या उज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजाराम ढेरंगे, सचिव दिलीप भोसले, उपाध्यक्ष प्रकाश खैरमोडे तसेच संचालक मंडळ, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक शिक्षक संघ यांच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आलेले आहे.