पुणे प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मागील काही दिवसांपासून चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या केल्या आहेत. पण पुन्हा एकदा मनोज जरांगे आमरण उपोषण करणार आहेत.
मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा आणि मराठा आरक्षण लागू व्हाव, यासाठी आमरण उपोषण करणार आहे; असे मनोज जरांगे यांनी जाहीर केल आहे.
तसेच त्यांनी सरकारच्या अधिसूचनेवरुन टीका करणाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. ‘काही जण सरकारची सुपारी घऊन सोशल मीडियावर ट्रॅप करत आहेत. त्यांना पद पैसे हवे आहे,’ असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. येत्या 10 फेब्रुवारीपासून जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत, जरांगे पाटलांचे या निर्णयामुळे राज्य सरकारला मात्र आता पुन्हा घाम फुटणार आहे,