लोकसभा निवडणूक अनुषंगाने इंदापुर भाजपा कार्यकारणीची दिनांक २४ रोजी बैठक

Bharari News
1 minute read
0
पुणे जिल्हा प्रतिनिधी
                 लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असुन. त्या अनुषंगाने दि. २४ रोजी इंदापूर येथील दूधगंगा उत्पादक संघाच्या सभागृहा मध्ये भाजप कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला सर्व पदाधिकारी तसेच ज्येष्ठ व तरुण कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
                सर्व कार्यकर्त्यांना पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व भाजपा युवामोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ.अंकिता पाटील- ठाकरे व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व इंदापुर भाजपा कोअर कमिटी प्रमुख श्री.राजवर्धन पाटील हे कार्यकर्त्यांच्या भावना ऐकल्या नंतर मार्गदर्शन करणार आहेत.इंदापूर तालुक्यामध्ये भाजप कार्यकर्त्यां मध्ये मित्र पक्षाबद्दल प्रचंड रोष व्यक्त होत आहे. कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या लोकसभेला मित्र पक्षाचे काम करायचे नाही असा कार्यकर्त्यांचा पक्ष नेतृत्वाकडे रेटा राहनार आहे.                   २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकी नंतर याच कार्यकर्त्यांना विरोधी पक्षांच्या लोकां कडून प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.त्यातच गेल्या आठवड्यात पुणे जिल्हा परिषद सदस्या व भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ.अंकिता पाटील -ठाकरे व नीरा भीमा साखर कारखान्याचे संचालक व इंदापुर भाजपा कोअर कमिटी प्रमुख राजवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्या मध्ये पत्रकार परिषद घेत या लोकांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे असे वक्तव्य करत मित्र पक्षातील नेत्यांना प्रति अवाहन दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक २४ रोजी भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकी होणार असून या बैठकीत लोकसभेला मित्र पक्षाचे काम करायचे का नाही ही भूमिका स्पष्ट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Today | 23, June 2025