रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथे वेश्या व्यवसाय करणा-या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करत एका महिलेची पोलीसांनी केली सुटका असल्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.
पुणे ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा उचलला असून पोलीस अधिक्षक पुणे ग्रा. यांनी त्यासाठी स्वतंत्र पथके तयार केलेली आहेत. त्या पथकातील. दर्शन दुगड (I.P.S) हे साध्या वेषामध्ये नगर पुणे हायवे रोडवरील हॉटेल, लॉजेस मध्ये चालणा-या अवैध धंद्यांबाबत माहिती काढत असतांना त्यांना दि. २२ फेब्रुवारी रोजी कारेगाव येथील यश ईन चौका पासून आतमध्ये जाणाऱ्या रस्त्याच्या एका तीन मजली इमारतीमधील खोलीमध्ये वैश्याव्यवसाय चालु असल्याची माहिती आयपीएस अधिकारी दर्शन दुगड यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना दिली
तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिरूर येथील पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे, विनायक मोहिते, परशुराम म्हस्के, दिनेश कुंभार व महिला पोलीस आर. बी. टोपे यांनी सदर ठिकाणी एक बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला असता होते. सदर ठिकाणी अवैध्यरीत्या वेश्याव्यवसाय चालत असल्याची खात्री झाल्यावर दर्शन दुगड यांचे पथक व पोलीस निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे यांचे पथक असे दोन्ही पथकांनी सदर ठिकाणी खाजगी वाहनातून जावुन रात्री ११ वा छापा टाकला असता . सदर छापा कारवाई मध्ये उड़ीसा राज्यातील एक ४० वर्षीय महिला मिळून आली असुन तिच्या असहाय्यतेच्या फायदा घेवुन अवैध्यरित्या देहविक्री करीत असताना आरोपी अर्जुन रामसमुझ वर्मा वय २४ वर्षे, सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ रा. पुरेफेरी, सराया महेशा, तिलोई, जि. रायबरेली, उत्तर प्रदेश. , मंगलसिंग संतोषसिंग गेहलोत वय ३३ वर्षे, सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे. मुळ रा. शिवनी खदान, ता.जि. अकोला , बबलु दुखबंधु साहु वय ४० वर्षे, सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे. मुळ रा. तालघर, ता. जि. डेकालाल, उड़ीसा, हे मिळुन आले आहेत. पोलीसांनी सदर आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडील रोख रक्कम, कंडोमची पाकिटे, मोबाईल असा एकुण ३१,४१०/रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींना दि. २३ रोजी अटक करण्यात आलेली असुन न्यायालयाने आरोपीना दि. २६ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. तसेच सदर गुन्हयातील पिडीत महिलेस न्यायालयाच्या आदेशाने रेस्क्यू फॉउंडेशन, पुणे येथे समुपदेशनासाठी पाठविण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक
पंकज देशमुख , अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पो. अधिकारी शिरुर विभाग प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शना खाली. प्रशासकीय दर्शन दुगड पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे,. विनायक मोहिते, परशुराम म्हस्के, दिनेश कुंभार व महिला पोलीस कर्मचारी आर. बी. टोपे, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, विलास आंबेकर, माऊली शिंदे, वैजनाथ नागरगोजे, शुभम मुत्याल यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे रांजणगाव . हे करत आहेत.
पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तसेच परिसरातमध्ये अशा प्रकारे कोणी अवैध धंदे करणारे व्यक्तींना जागा, घर भाड्याने देईल अशा जागा व घर मालकांना देखील गुन्हयामध्ये आरोपी करण्यात येईल. तसेच नागरीकांना कोणी माथाडी, प्लेसमेंटच्या नावाखाली पैशांची मागणी करुन फसवणुक, खंडणीची मागणी करत असल्यास त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.