शिरूर तालुका पुरवठा विभागात अनागोंदी कारभार...तालुक्यातील गोरगरीब लाभार्थ्यांना त्रास

Bharari News
0
शिरूर तालुका पुरवठा विभागात अनागोंदी कारभार...तालुक्यातील गोरगरीब लाभार्थ्यांना त्रास

इंटरनेट नेटवर्क च्या नावाखाली सर्व सामान्य जनतेची पिळवणूक तर कार्यालयामध्ये सगळा प्रभारी कारभार...जबाबदार कोण ?
शिरूर प्रतिनिधी 
              शिरूर तालुक्यातील पुरवठा विभागात चक्क एका रेशनकार्ड वरील नाव कमी करण्यासाठी पूर्ण दिवसभर पुरवठा विभागाच्या दारात तासन-तास बसून सुद्धा काम झाले नाही असा प्रकार घडून आलेला आहे.सर्व ग्रामीण व शहरी भागातील लोकांना पुरवठा विभागात आपल्या शिधापत्रीकातील नाव कमी करणे, नाव वाढ करणे, नवीन रेशन कार्ड काढणे या साठी शिरूर येथे यावे लागत आहे परंतु ते पुरवठा विभागाच्या दारात गेल्यावर त्या ठिकाणी बाहेरील फलक वाचून परतीचा मार्ग दाखवला जात असल्याचा प्रकार निदर्शनात आला आहे. मग पुरवठा विभागातील कर्मचारी कुठले काम दिवसभर करत असतात असा प्रश्न सर्व सामान्य नागरीकांना पडताना दिसून येत आहे.
पुरवठा विभागात जाणाऱ्या संबंधित व्यक्तीला त्यांना आपल्या कामाची ऑनलाईन प्रक्रिया करून आणण्यासाठी परत परतीचा मार्ग दाखवला जात आहे. 
                आपण ऑनलाईन नोंदणी बाहेरून किंवा स्वतः करून घ्या असे सांगितले जाते मोलमजुरी करणारी शेतकरी कुटुंबातील सर्वसाधारण व्यक्ती पुरवठा विभागाच्या समोरील बोर्ड वाचून पुन्हा आपल्या गावी जातात आणि शासनाने शासकीय अधिकारी वर्ग नेमून दिलेला आहे तो फक्त आपल्या खिरापत दाराची कामे करण्यात व्यस्त दिसत आहे .
             आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांची रेशनकार्ड ऑनलाइन असणे आवश्यक असल्याने अनेक नागरिक कित्येक दिवस यासाठी या कार्यालयात फेरा मारत आहे यावर जिल्हापुरवठा विभागाने कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत. मात्र या विभागाचे कामकाज सुरळीत होताना दिसत नाही या सर्व कामासाठी नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा देखील तक्रारी आहेत या विभागात आपण तातडीने फेरबदल करून या विभागाचे कामकाज सुरळीत करावे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे 
               कार्यालयात सगळ्या प्रभारी कारभार असल्यामुळे व तालुक्याला पूर्ण वेळ पुरवठा निरीक्षक लक्ष देत नसल्यामुळे जनतेची अनेक कामे खोळंबली आहे "भीक नको पण कुत्रा आवरा अशी अवस्था शिरूरकरांची झाली आहे? मग सर्व सामान्य नागरिकांची कामे करणार तरी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!