सुनील भंडारे पाटील
पेरणे (तालुका हवेली ) येथील राधाकृष्ण विद्यालय पेरणे, शाळेतील बाळासाहेब नारायण जाधव या मुख्याध्यपकाने त्यांच्याच शाळेतील शिक्षेकेस शिविगाळी करत हेल्मेट फेकून मारत धमकी दिली असून शिक्षिकेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार लोणीकंद पोलीसांनी मुख्याध्यापकांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे .
पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार सदरील शिक्षिका राधाकृष्ण विद्यालय पेरणे गाव येथे मागील दोन महिन्यापासुन नोकरी करते आज दि. २८/२/२४ रोजी सकाळी १०.०० वाजता शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव हे प्रशाले मध्ये त्यांची खाजगी दुचाकी चार्जिंग करत असताना सदरिल शिक्षेकेने त्यांना प्रशाले मध्ये खाजगी गाडी चार्जिंग करु नका असे सांगितल्याचा राग आला व मुख्याध्यापकाने शिक्षेकेस शिवीगाळ करत अंगावर धावुन जाऊन शिक्षेकेस हेल्मेट फेकून मारले सुदैवाने शिक्षिका बाजुला झाल्यामुळे थोडक्यात बच्यावल्या कुठलीही इजा झाली नाही तसेच त्यांनी शिक्षिकेस निलंबीत करण्याची व पोलीस ठाण्यात तुझी तक्रार करतो अश्या धमक्या मुख्याध्यापकाने शिक्षिकेस दिल्या आहेत
सदरिल शिक्षेकेच्या फिर्यादीवरून मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव रा. चाकण तळेगाव दाभाडे चौक ता खेड जि पुणे यांच्यावर अदखलपात्र प.न.क.र.नं. 414/2024 भा.द.वी.का.352, 504,506 कलमाअंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहे,