सुनील भंडारे पाटील
बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या २५ बुलेटवर लोणीकंद वाहतूक पोलिस विभागाने कारवाई केली आहे. बुलेटचे सायलेन्सर काढून घेऊन दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. जप्त केलेल्या २५ सायलेन्सरवर पोलिसांनी रोड रोलर फिरवला. वाघोली तसेच परिसरातील गावांमधील शाळा, महाविद्यालय परिसरात सायलेन्सरचा आवाज काढून फिरणाऱ्या बुलेटची माहिती पोलिसांना कळवावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चार्ज घेतल्यावर पुणे शहरातील रेकॅार्डवरील गुन्हेगारांची हजेरी घेवुन सज्जड दम भरलेनंतर पुणेकरांच्या वाहतुक समस्येतून मुक्त करण्याच्या दृष्टीने पावले उचली आहेत. तसेच पोलीस आयुक्त वाहतुक कोंडी सोडवण्याबाबत ठोस उपाययोजना करणेबाबत विचारधीन आहेत. त्याबरोबर बुलेटच्या सायलेन्सर मधून कर्णकर्कश आवाज काढून हिरोगिरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार ज्या बुलेटच्या सायलेन्सर मध्ये फेरफार करून कॉलेज परीसर व सामान्य नागरिाकांना त्रास होईल अशा पद्धतीने रोडरोमिओ हे त्या बुलेटच्या पुंगळ्या काढुन वेगवेगळे आवाज काढुन रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवित अशा हिरोंवर लोणीकंद वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी कठोर कारवाई सुरु केली आहे. सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या २५ बुलेट चालकांवर लोणीकंद वाहतूक पोलिस विभागाने कारवाई केली आहे.
वाहनावरील दंड तडजोडीने भरण्याची संधी :
पुणे शहर वाहतुक शाखेमार्फत ९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत लोक अदालत राबविण्यात येत असून ज्या वाहनांवर दंड आहे अशा वाहनांचा दंड तडजोड शुल्क आकारुन भरून घेण्यात येणार आहे तरी या संधीचा जास्तीत जास्त फायदा लोणीकंद विभागातील नागरिकांनी करून घ्यावा असे आवाहन लोणीकंद वाहतुक विभागाने केले आहे.
आपल्या परिसरात सायलेन्सर मधून कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या बुलेट फिरत असतील तर त्या बुलेटचा फोटो काढुन ९८२२७४२३३३ या क्रमांकावर पाठवावा. फोटो पाठवणाऱ्यांचे नावे गुप्त ठेवून अशा बुलेटवर कठोर कारवाई केली जाईल. – गजानन जाधव, सुहास पाटील (सहा. पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, लोणीकंद, वाघोली )