पुणे जिल्हा प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षानेच प्रचाराचा धडाका लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भोरमधील कापूरहोळ येथे शनिवार (दि.९) रोजी जाहीर सभा घेतली असुन
या सभेमध्ये शरद पवारांनी त्यांच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा सुद्धा केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या नावाची महा विकास आघाडीच्या उमेदवार म्हणून घोषणा झाली आसुन.भोर तालुक्या मधील कापूरहोळच्या सभेत शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे व तुतारीचे रणशिंग फुंकले आहे.बारामती लोकसभेसाठी दोन्ही पवार गटांकडून अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आली नसली तरी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशीच लढत होणार हे आता स्पष्ट झालं आहे. त्याचमुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट सक्रिय झाले आहेत. शरद पवारांनी काँग्रेसचे नेते अनंतराव थोपटे यांच्या भोर मधील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. थोपटें सोबत असलेला संघर्ष मिटवण्यासाठी जाणीव पूर्वक भोर मध्ये पहिल्या सभेच आयोजन करण्यात आल्याचं बोलल जात आहे.
यावेळी शरद पवारांनी बोलताना म्हणाले की,तुमच्या सगळ्यांच्या समोर उमेदवार म्हणून सुप्रियाची उमेदवारी देत आहोत. तुम्ही सगळ्यांनी तिला तीनदा निवडून दिलं. काम करणाऱ्यांमध्ये पहिल्या दोन-तीन क्रमांकाचे खासदार आहेत, ज्यांचा लौकिक आहे त्यात तुमच्या उमेदवाराचा पहिल्या नंबरचा नाव लौकिक आहे, असे यावेळी बोलताना शरद पवारांनी सुप्रिया सुळेंचं कौतुक केलं आहे. तसेच यावेळी बोलताना शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ही निशाणा साधला आहे.
मोदींची गॅरंटी म्हणतात, कसली गॅरंटी? त्यांनी सांगितलं होतं की परदेशात काळा पैसा आहे, तो काळा पैसा मी भारतात परत आणेन आणि शेतकऱ्याच्या खिशात टाकेन. एक दमडा परदेशातून आणला नाही. पाच-पन्नास देशांमध्ये चकरा टाकल्या, त्या देशात आपण त्याचे महत्त्वाचे घटक आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण शेतकऱ्यांच्या खिशा मध्ये तो काळा पैसा आणून त्यांना संपन्न करण्याचं धोरण त्यांनी सांगितलं होतं, त्याची अंमल बजावणी सुद्धा साधी त्यांनी केली नाही अशी टीका ही शरद पवारांनी केली आहे. या कार्यक्रमाला उपस्थित शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत, कॉंग्रेसचे आमदार- बाळासाहेब थोरात, आमदार-संग्राम थोपटे,आमदार- संजय जगताप, खासदार- सुप्रिया सुळे, माजी आमदार- शशिकांत शिंदे तसेच सक्षणा सलगर व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने भोर तालुक्या मधील जनता या वेळी कार्यक्रमाला उपस्थित होती.