आळंदी प्रतिनिधी
आळंदी येथील आळंदी नगरपरिषद प्रभाग क्रमांक ९ मधील रहिवासी नागरिकांच्या रहदारीसाठी सोनाई हाईस्ट लगतच्या गार्डन मधून रस्ता विकसित करून देण्याची मागणी शिवसेनेचे शहराध्यक्ष, श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी केली आहे.
या मागणीसाठी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधण्यात आले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या भागात सद्या रस्ता उपलब्ध नसल्याने केवळ २ फूट अरुंद रस्त्यातून ये जा करताना तारेवरची कसरत करून जावे लागते. यामुळे येथील रस्त्याची गैरसोय असल्याने आळंदी नगरपरिषद पाण्याची टाकी प्रभाग क्रमांक ९ मध्ये सोनई हाईट्स हि इमारत डोंगरावर पाण्याचे टाकी शेजारी आहे. या इमारतीचे समोर आळंदी नगरपरिषदेचे गार्डन आहे. या गार्डन मधील जागेतून समोरील जाधव निवास ते मीना उर्फ नानी वडेकर यांचे घरा समोरील रस्ता विकसित करून देणे बाबत नागरिकांची मागणी आहे.
यासाठी प्रलंबित मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासह या ठिकाणी ये - जा करण्यास गैरसोय असल्याचे प्रशासनाचे निदर्शनात आणून देण्यात आले आहे. या भागातील परिसर मोकळा व विस्तीर्ण असल्याने मद्यपिंचे मुळे रहदारीस नागरिकांना अडचण होत आहे. कामा निमित्त बाहेर गेलेल्या नागरिक, महिला, पुरुष यांना रात्री अपरात्री घरी परत ये जा करण्यास रस्त्या अभावी गैरसोय होत असल्याने तात्काळ रस्ता विकसित करून सोय करण्याची मागणी आहे. या संदर्भात मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी गैरसोय दूर केली जाईल. नगरपरिषद रस्ता विकसित करून देण्यास सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.