पुणे जिल्हा प्रतिनिधी
इंदापूर येथे आज दि.२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याला शरद पवार पवार यांचे सोबत सुप्रिया सुळे उपस्थित राहिले. याप्रसंगी इंदापूरकरांनी पवार व माझ्यावर भरभरुन प्रेम केले असून मला तीन वेळा लोकसभेत निवडून पाठविण्यात सिंहाचा वाटा उचलला याबद्दल त्यांचे आभार मानले.
तसेच यावेळेसही आपली लोकप्रतिनिधी म्हणून पुन्हा एकदा संधी द्यावी, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांना केले. या शेतकरी मेळाव्याला लोकांनी येऊ नये यासाठी काही जणांनी विविध माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण अशा दबावाला इंदापूरकर जुमानत नाहीत, ते नेहमीच सत्य आणि स्वाभिमाना च्या बाजूने उभे राहतात हे आजच्या प्रतिसादावरुन दिसून आले. हा तालुका स्वाभिमानी आणि साहेबांबर प्रेम करणारा आहे. इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावासोबत साहेबांचे अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहेत, असे सांगून जुन्या आठवणींंना उजाळा दिला.
आजवर अनेक निवडणुका झाल्या, पण विरोधकांसोबत असलेल्या वैयक्तिक संबंधांमध्ये कधीही कटुता येऊ दिली नाही. मागील निवडणूक कांचन कुल यांच्या विरोधात लढविली होती. पण आज मी कांचन कुल आणि राहुल कुल यांचे अभिनंदन करते, कारण आम्ही एकमेकांवर कधीही पातळी सोडून टिका केली नाही. पण आज मात्र वेगळे चित्र आहे. मी युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांना सुरक्षा द्या अशी मागणी केल्याने माझ्यावर टिका झाली.
युगेंद्र हा लोकशाही मार्गाने पक्षाचा प्रचार करत असताना त्याची अडवणूक करण्यात आली. त्यामुळे मी सुरक्षा द्या अशी मागणी केली होती. मग यात गैर काय? इथे असणारा प्रत्येक युवक माझा मुलगा आहे, उद्या जर कोणी यांना दमदाटी केली, हल्ला केला तर त्यावेळी त्याच्या आईचा कोण विचार करणार आहे का? असा सवाल उपस्थित केला.
बातम्यांमधून समजले की साहेबांच्या सभेला लोकांनी जाऊ नये, म्हणून काहीजण प्रयत्न करत होते. पण हा स्वाभिमानी इंदापूर तालुका आहे. साहेबांवर प्रेम करणारी माणसं तुमच्या दबावापुढे झुकणार नाहीत. धमकी देणाऱ्या विरोधकांचा आगामी विधानसभेत जनता करेक्ट कार्यक्रम करणार असे नमूद केले. राहुल नावाचा एक युवा शेतकरी सभेला आला आहे, त्याने गळ्यात कांदा आणि दुधाचा हार घातला आहे. कारण आज त्याला चांगला दर भेटत नाही. तो शेतकऱ्यांच्या कांदा आणि दुधाला चांगला भाव मिळावा म्हणून लढा देत आहे. यावेळी बोलताना केंद्र सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची माहिती दिली, हे सरकार शेतकरीविरोधी असून या सरकारला बदलण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे आहे, असे स्पष्ट केले.
यंदाच्या निवडणूकीत इंदापूर तालुक्यात स्वाभिमानाची तुतारी वाजेल असा विश्वास व्यक्त केला. अनेकांना वाटले की पक्ष काढून घेतल्यामुळे आम्ही रडत बसू, पण आम्हाला आमची आजी शारदाबाई पवार यांनी रडायला नाही तर लढायला शिकवले आहे. आमची लढाई ही भ्रष्टाचार आणि अन्यायाच्या विरोधात आहे. त्यामुळे माझ्यावर टिका करणाऱ्यांनी टिका करताना विचार करुन करा असा इशारा दिला.
इंदापूरच्या मुख्य चौकात येऊन विकास झाला का नाही यावर चर्चा करुया असे आव्हान विरोधकांना दिले. कारण येथील विकास महाविकास आघाडीच्या काळात झाला, मंत्रीपद महाविकास आघाडीने दिले त्यामुळे आभार मानायचे असतील तर उद्धवसाहेब ठाकरे, पवार साहेब आणि काँग्रेस पक्षाचे मानावे लागतील असे सांगितले.
इंदापूरचा विकास काँग्रेसच्या विचाराने झाला आहे. महाविकास आघाडीची सत्ता असताना इंदापूरला लाल दिवा होता, पण भाजपाची सत्ता आली आणि इंदापूरचा लाल दिवा काढून घेतला,याची आठवण करुन दिली.लोकसभेत महाविकास आघाडी ४८ जागा लढेल आणि सर्व जागा जिंकून आणण्यासाठी काम करेल अशी ग्वाही दिली. तुमची हि लेक देशातील नंबर एकची खासदार ठरली आहे. त्यामुळे गुणवत्ता बघून मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी मेळाव्यासाठी आलेल्या सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यसभा खासदार संजयजी राऊत, आमदार संजय जगताप, रोहित पवार, राजेंद्र दादा पवार, शर्मिला वहिनी, रविकांत वरपे, सक्षणा सलगर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, तेजसिंह पाटील, महारुद्र पाटील, विलास लवांडे, भारती शेवाळे, छाया पडसळकर, महादेव बालगुडे, पंडीत कांबळे, शरद सुर्यवंशी, अमोल देवकाते, सागर मिसाळ, शिवाजीराव जांभुळकर, सोपानराव मस्के, दादासाहेब थोरात, राहुल मखरे, अरबाज शेख, अमोल भिसे, अनिकेत निंबाळकर, आबासाहेब निंबाळकर, साक्षी फलांगे, सोमनाथ भोंगे, शिवाजी खटकाळे, भीमराव भोसले यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.