यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदाची बुधवारी होणार निर्णायक बैठक

Bharari News
0
लोणी काळभोर प्रतिनिधी 
             थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याला तब्बल १३ वर्षा नंतर नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष लाभणार आहे. कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदांची निवडणूक बुधवारी (दि. २७) कारखाना कार्यस्थळावर होणार आहे. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी शीतल पाटील यांनी नवनियुक्त संचालक मंडळाला निवडीसाठी अजेंडा बजावला आहे.
           13 वर्षांपूर्वी अर्थिक भांगभांडवलाअभावी बंद पडलेल्या कारखान्यावर संचालक मंडळातून प्रत्यक्ष अध्यक्षपदाची निवड होणार आहे. कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर,कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अण्णासाहेब मगर विकास आघाडीने वर्चस्व गाजवून २१ पैकी १८ जागांवर विजय संपादन केला होता.
              या सत्ताधारी गटाच्या संचालक मंडळात पॅनेलप्रमुख प्रकाश जगताप यांचे बंधू व गत संचालक मंडळात संचालकपद भूषविलेले सुभाष जगताप हे एकमेव कारखान्याच्या कामाकाजाचा अनुभव असलेले संचालक अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार असणार आहेत, तर दुसरीकडे कारखान्यासाठी न्यायालय, राज्य सरकार व प्रशासकीय पातळीवर सतत संघर्ष केलेले माजी संचालक पांडुरंग काळे यांचे चिरंजी व मोरेश्वर काळे हे पण शर्यतीत राहणार का, अशी चर्चा सुरू आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!