रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत ५ देशी आणि १ जर्सी गोऱ्हा अशा ६ गोवंशानां कत्तलीपासुन जीवनदान

Bharari News
0
गोहत्या मुक्त हिंदुस्थान हिच आद्यगोरक्षक शिवछत्रपतींची इच्छा

रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत ५ देशी आणि १ जर्सी गोऱ्हा अशा ६ गोवंशानां कत्तलीपासुन जीवनदान
शिरूर प्रतिनिधी 
               दिनांक २१/०३/२०२४ रोजी रात्री १०.३० वाजता गुप्त बातमीदारामार्फत पेरणे फाटा येथुन अहिल्यानगर येथे गाई बैल कत्तलीसाठी जाणार आहे अशी माहिती मानद पशुकल्याण अधिकारी गौरव शिंदे यांना मिळ्याल्यानंतर त्यांनी त्यांचे विश्वासू सहकारी बजरंग दल शिरूर प्रखंडाचे संयोजक अजिंक्य तारु यांना माहिती कळवली अजिंक्य तारु व त्यांच्या सहकाऱ्यांनी MH 12 RN 2397 मारुती सुझुकी सुपर कॅरी हा टेम्पो शिक्रापूर बाजुकडून अहिल्यानगर बाजुकडे भरधाव वेगाने जाताना दिसताच अडवण्याचा प्रयत्न केला असता तो थांबला नाही त्याचा पाठलाग करत ५०० मी. अंतरावर चालकाने खंडाळा माथ्याच्या पुढे गाडी थांबवुन पळ काढला.
           सदर टेम्पो पुर्णपणे पॅकबंद होता दरवाजा उघडला असता त्यामध्ये २ खिलार गाई व १ गोऱ्हा, १ गावरान गाई व १ गोऱ्हा आणि १ जर्सी गोऱ्हा अशे ६ गौवंश दाटीवाटीने कोबुन भरलेले दिसले त्यातील १ गाई खाली पडली होती, गौरक्षकांनी त्वरीत रांजणगाव पोलिस स्टेशनशी संपर्क करुन गाडी पोलिस स्टेशनला जमा केली व गाडी मालकांवर गोवंश हत्याबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करुन सदर वाचवलेले ६ गोवंश श्री गौरक्ष पांजरपोळ संस्था शिरुर येथे सुखरुप सोडण्यात आले यावेळी गोशाळेचे मोलाचे सहकार्य लाभले.
           या कारवाईत बजरंग दल शिरुर प्रखंड संयोजक अजिंक्य तारु, बजरंग दल रांजणगाव संयोजक रवी जगदाळे व त्यांचे सहकारी अमोल लुनिया, गणेश इंदोरे, विशाल पवार, श्रीकांत रांजने, विशाल शिंदे, शिव कदम, गौरव लोढा, प्रतिक शर्मा या गोरक्षकांनी मोलाची कामगिरी केली.
               कारवाई यशस्वी करण्यासाठी अखिल भारत कृषी गोसेवा संघ प्रदेशअध्यक्ष मिलिंदभाऊ एकबोटे
अखिल भारत कृषी गौसेवा संघ पुणे जिल्हाध्यक्ष उपेंन्द्र बलकवडे, मानद पशुकल्याण अधिकारी अभिजित चव्हाण, ऋषी चावरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!