सुनील भंडारे पाटील
'अभियान प्रतिष्ठान ' ही पुण्यातील नामवंत सामाजिक संस्था म्हणून ओळखली जाते. गेली २७ वर्षे वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांद्वारे या संस्थेने पुणेकरांच्या मनामध्ये एक स्थान निर्माण केलेले आहे. त्यांच्या वतीने जिजामाता सहकारी बँकेच्या संचालिका रेखाताई बांदल यांना स्त्रीशक्ती पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले,
गेली २१ वर्षे "पुणेरत्न" पुरस्काराने अभियान प्रतिष्ठान पुणे शहरात तसेच संपूर्ण जिल्ह्यात जन्मलेल्या वा पुण्यासाठी काही भरीव कामगिरी केलेल्या मान्यवरांना गौरव करण्यात येतो.पूणेरत्न पुरस्कार स्वीकारलेल्या मान्यवरांपैकी "मा.बाळासाहेब ठाकरे, पद्मश्री तळवलकर, पद्मश्री डॉ.डी.वाय पाटील, समाजसेविका मा.रेणू गावस्कर" यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे,
जागतिक महिला दिन हा दी.८ मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो. या महीलादिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ७ मार्च रोजी विविध क्षेत्रात तेजस्वी छाप पाडणाऱ्या ५ महिलांचा स्त्री शक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, त्यामध्ये शिक्रापूर येथील रेखाताई मंगलदास बांदल यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले,
रेखाताई बांदल यांनी बोलताना सांगितले की, जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बचत गट स्थापन करून महिलांसाठी आर्थिक मदत तसेच महिलांसाठी रोजगार लहान मोठे व्यवसाय यासाठी आतापर्यंत अनेक प्रयत्न केलेत भविष्यकाळ देखील प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले,