देशाचे अर्थ राज्यमंत्री मा.श्री.भागवत जी कराड साहेब हे बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आले असताना पुरंदर- हवेली मतदार संघातील दिवे येथे शेतकरी मेळावा व लाभार्थी संपर्क मेळावा आज दि.१५ रोजी संपन्न झाला.
या वेळी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करताना सांगितले कि, केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी खुप मोठ्या प्रमाणात चांगल्या योजना राबवत आहे म्हणुनच थोड्याच दिवसांमध्ये शेतकर्यां साठी चांगले दिवस येणार आहेत या योजनांमधील पीएम किसान सम्मान निधी हि योजना शेतकर्यां साठी वरदान ठरलेली आहे त्या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये खुप मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे त्याला ते केंद्र सरकार व राज्यसरकार दोन्हीचे मिळून बारा हजार रुपये येत असल्याने शेतीच्या कामासाठी त्याला त्या पैशांची मदत होत आहे असे यावेळी बोलताना मंत्री महोदय यांनी सांगितले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे होते. तसेच बारामती मतदार संघातील काळखैरे वाडी येथे विशेष सामाजिक समूहातील नागरिकांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी भारतीय जनता पार्टी चे सरचिटणीस शेखर वढणे, आकाश कांबळे, मा.आमदार-दादा जाधवराव, बाबाराजे जाधवराव, नवनाथ पडळकर, स्नेहल ताई दगडे ,निलेश जगताप , दिलीप आप्पा खैरे, जान्हवी ताई बोरसे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे, गोविंद देवकाते, मारुती अण्णा वणवे, गजानन वाकसे, माऊली चवरे, रमेश चांदगुडे, बाळासाहेब पानसरे, अमोल प्रभुणे,तसेच इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते , शेतकरी व लाभार्थी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.