लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी राज्यभरातून ४५ हजार शस्त्रे (रिव्हॉल्व्हर, पिस्तूल) ताब्यात घेतली आहेत. त्याचप्रमाणे ३०८ बेकायदेशीर शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.राज्यात एकूण ७७ हजार १४८ शस्त्र परवान्यांचे वाटप करण्यात आलेले आहे.
राजकीय नेते, व्यावसायिक, उद्योगपतींसह खासगी कंपन्यांच्या सुरक्षा रक्षकांचा त्यात समावेश आहे. निवडणुकीच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून परवाना धारकांकडील शस्त्रे ताब्यात घेतली जातात. निवडणुकीनंतर ती त्यांना परत केली जातात. आतापर्यंत ४५ हजार ७५५ शस्त्रे ताब्यात घेण्यात आली असून, उर्वरित शस्त्रे ताब्यात घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली.