अपघाताची शृंखला सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे, अशातच सध्या हाती आलेल्या बातमीनुसार पुणे येथून नगर मार्गे जाणारी भरधाव स्विफ्ट कार (नंबर कळू शकला नाही) रस्ता दुभाजकाला धडकून कासारी फाटा शिक्रापूर येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरवर जाऊन धडक दिली .
अपघात इतका भीषण होता की कार चा अक्षरश्या चेंदामेंदा झाला , सदर कार ही एक महिला चालवत होती कार वरील नियंत्रण सुटल्या मुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे, सुदैवाने कोणती ही जीवित हानी झाली नाही मात्र कारमधील सर्व प्रवाशी गंभीर जखमी आहे.सदर अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकानी अपघात स्थळी धाव घेत जखमींना कारमध्ये दबलेल्या प्रवाशाना बाहेर काढत नजीक च्या रुग्णालया मधे दाखल दाखल केले असून जखमीची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.