सातारा जिल्हा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणाऱ्या टोळीतील चार आरोपींना महाराष्ट्र कायदा कलम 55 प्रमाणे सातारा,पुणे तसेच सोलापूर या तिन जिल्ह्यांमधून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे , या नोव्हेंबर 2022 पासून आत्तापर्यंत 105 गुन्हेगारांना तडीपार करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतिश उर्फ बाबू राजेंद्र कांबळे, विशाल शेखर वाडेकर, रामा दादा मंडलिक तसेच संजय विजय कोळी यांचा समावेश असलेली ही टोळी शिरवळ परिसरामध्ये खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी , घरफोडी, गंभीर दुखापत पोचवून शिवीगाळ तसेच दमदाटी करणे , असे गंभीर गुन्हे करत होती तसेच या टोळीमुळे शिरवळ तसेच आसपासच्या परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावरती त्रास सहन करावा लागत होता.
म्हणून या अनुषंगाने शिरवळ पोलीस स्टेशनने या टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे पूर्णपणे सातारा, पुणे तसेच सोलापूर या तिन जिल्ह्यांमधून त्यांना दोन वर्षासाठी तडीपार करण्याचा प्रस्ताव हा हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केलेला होता या अनुषंगाने सदरील प्रस्तावाची चौकशी करून या टोळी मधील चारही सदस्यांना दोन वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले गेले आहेत.
हद्दपार प्राधिकरणापुढे सरकारी पक्षाच्या वतीने श्रीमती आंचल दलाल,अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर,पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा सातारा,श्रेणी पोलीस उपनिरीक्षक तानाजी माने,पोलीस हवालदार प्रमोद सावंत अमित सपकाळ पोलीस कॉन्स्टेबल केतन शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा सनस, शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सचिन वीर,आणि पोलीस कॉन्स्टेबल मंगेश मोझर यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या मार्गदर्शना खाली योग्य असे पुरावे सादर केल्याने व तो प्रस्ताव वरिष्ठांना पाठवल्या गेल्याने तसेच विद्यमान पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांनी वरील गोष्टींचा पाठपुरावा केल्याने सदरील कारवाई करण्यात आलेली आहे.