आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने,प्रेमाने भरारी न्यूज या प्रसार माध्यमाची यशस्वीपणे तिसऱ्या वर्षांमध्ये पदार्पण झाले असून, आज भरारी न्यूजचा दुसरा वर्धापन दिन साजरा होत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे,
अनेक वर्षांच्या प्रसार माध्यमांमधील आमच्या अनुभवानंतर आम्ही आपल्या सेवेसाठी गोरगरीब तसेच समाजातील अनेक तळागाळातील प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही दिवस-रात्र तत्पर आहोत,आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आमची सर्व भरारी न्युज परिवाराची वाटचाल अतिशय चांगल्या स्वरूपाची चालली असून आपण दिलेल्या प्रतिसादाची आम्ही शतशः रुणी आहोत,
भरारी न्यूजने आपल्या वाटचालीमध्ये सोशल मीडियाचे सर्व क्षेत्र काबीज केले आहे, त्यामध्ये मुक्त पत्रकारिता करताना अनेक अडचणी येत आहेत आज देखील भरारी न्यूजचे यूट्यूब चैनल युट्युब कंपनीने बंद केले आहे, परंतु पर्यायी मार्ग अवलंबून महत्त्वाच्या बातम्या तसेच व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत,
प्रसार माध्यमांमधील काही ऑनलाइन माध्यमांमध्ये खुलेआम फसवणुका चालू असताना अशा पोस्टमुळे त्या कंपन्यांना काही अडचणी वाटत नाही, परंतु भरारी न्यूज च्या बातम्यांमुळे चुकीचे कंटेंट वापरताय असा सूचना देऊन भरारी न्युज चे फेसबुक आणि युट्युब सारखे बंद केले जात आहे, याचा भरारी न्युज च्या वाटचालीस अडथळा निर्माण होत आहे,
अशा प्रकारच्या खडतर प्रवासातून आम्ही आपल्यापर्यंत समाजातील अनेक स्तरां मधील प्रश्न पोहोचवण्यामध्ये आजही यशस्वी आहोत, ऑनलाइन प्रसाराच्या माध्यमातून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्या गाव, पंचक्रोशी, तालुका, जिल्हा, राज्य, देश व संपूर्ण जगामध्ये पोहोचवत आहोत, आम्हाला या गोष्टीचा आनंद होत आहे की, आपल्या भरारी न्युज चे आपल्या देशाबरोबर परदेशातही सबस्क्रायबर झाले आहेत,