सुनील भंडारे पाटील
बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे बालाजी इंग्लिश मिडियम स्कूल (शिरूर) येथे मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात ही सरस्वती पूजनाने झाली, यावेळी शिरूर नगरपरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता काळे मॅडम,बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे चेअरमन.सदाशिव अण्णा पवार, असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर विजय आंधळे, सिटी कॉर्डिनेटर नगरपरिषद प्राची वाखारे, स्वाती थोरात, शिक्रापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोसुरे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक संभाजी तळेकर, बालाजी इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य गणेश मिटपल्लीवार , बालाजी विश्वविद्यालयाचे प्राचार्य. विनायक म्हसवडे, शिरूर प्रबोधन मंचाचे राजू चोंधे व भाऊसाहेब बेंद्रे तसेच पत्रकार सतीश धुमाळ व पत्रकार प्रवीण गायकवाड हे उपस्थित होते.
कार्यक्रमांमध्ये शिरूर नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता काळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मतदानाविषयीचे महत्त्व समजून सांगितले. यामध्ये त्यांनी लोकशाही विषयीचे मार्गदर्शन केले 'लोकांनी लोकांसाठी लोकांतर्फे चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही'. हे पटवून दिले. याचबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांतर्फे त्यांच्या पालकांनाही दिनांक 13 मे २०२४ रोजी मतदान केंद्रावर जाऊन आपल्या बहुमुल्य मतदानाचा हक्क बजवावा असे सांगितले.
डॉ. मिलिंद भोसुरे, संभाजी तळेकर, पत्रकार गायकवाड सर, भाऊसाहेब बेंद्रे यांनी देखील मतदानाविषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहून मतदानाविषयी आवाहन केले.
कार्यक्रमाचे आयोजन माया बेंद्रे,मानसिंग कांबळे,साईनाथ टाळे, ज्योती जगदाळे यांनी प्राचार्य गणेश मिटपल्लीवार यांच्या मार्गदर्शनाखाली केले. सूत्रसंचालन मोनाली मिटपल्लीवार व आभार प्रदर्शन उपप्राचार्या प्रणिता शेळके यांनी केले.