इंदापूरच्या तहसीलदारवर अज्ञात इसमांचा हल्ला; थोडक्यात बचावले

Bharari News
1 minute read
0
पुणे जिल्हा प्रतिनिधी
             इंदापूर येथे दि २४ रोजी तहसील कचेरीच्या हाकेच्या अंतरावर तहसीलदार श्रीकांत पाटील यांची सरकारी गाडी जात असताना अज्ञात इसमांनी लोखंडी रोड व मिरची पूड टाकून जीव मारण्याचा प्रयत्न केला आहे या घटनेमध्ये तहसीलदार श्रीकांत पाटील हे थोडक्यात बचावले आहेत परंतु गाडीच्या काचा फोडून चालकाच्या अंगावर मिरची पावडर टाकून मारण्याचा प्रयत्न केला आहे.
सविस्तर हकीकत अशी आहे की आज दि.२४ रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान तहसील कचेरीत आपल्या सरकारी सुमो गाडीतून जात असताना संविधान चौक येथे अज्ञात जमावाने गाडी अडवून लोखंडी रॉडसह गाडीवर जोरदार हल्ला केला व तहसीलदार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच गाडीचा चालक यांच्या अंगावर मिरची पावडर टाकून मारण्याचा प्रयत्न केला परंतु या घटनेतून तहसीलदार यांच्यासह चालक थोडक्यात बचावले आहेत.
             ही घटना पाहून आजूबाजूचे लोक धावून आल्याने तहसीलदार व चालक थोडक्यात बचावले आहेत या हल्ल्यामध्ये गाडीचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Today | 22, June 2025