पुणे जिल्हा प्रतिनिधी
बारामती,प्रधानमंत्री घरकुल योजने अंतर्गत दहा हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी बारामती तालुक्यातील सोनवडी-सुपे ग्रामपंचायत येथे कार्यरत असणाऱ्या ग्रामसेविका हीस बारामती सत्र न्यायालयाने आज दिनांक २४ मे रोजी पाच वर्षांची शिक्षा आणि पंचवीस हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावलेली आहे.
बारामती तालुक्यातील सोनवडी-सुपे येथे आरोपी नाव-दिपाली जगन्नाथ कुतवळ, वय-३७, पद-ग्रामसेविका यांनी पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करून देण्यासाठी साल २०१७ मध्ये दहा हजार रुपयांची लाच स्विकारली होती.
त्यासंबंधी ला.प्र.वि.पुणे विभागाकडून दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ रोजी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७,१३(१)(ड) सह १३(२) या कलमान्वये बारामती पोलीस ठाण्यात सदरील गुन्हा हा दाखल करण्यात आला होता.सदरील गुन्ह्याचा सखोल तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक अर्चना दौंडकर यांनी पूर्ण करून बारामती न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र सादर केले होते.