शिक्रापूर ,(तालुका शिरूर) येथील मलठन फाटा परिसरात घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे, पुणे नगर महामार्गावर महत्त्वाची समजली जाणारी ग्रामपंचायत शिक्रापूर या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आल्याची सर्वत्र चर्चा चालू आहे, ग्रामपंचायत ने नाम फलक लावण्याबरोबर कचरा टाकणाऱ्या विरोधात ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे पुणे नगर मार्गावर ही परिस्थिती प्रवास करणारे प्रवासी उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत,
शिक्रापुर येथील मलठन फाटा परिसरात खूप मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही .विशेष बाब अशी की ग्रामपंचायत ने सदर जागेवर कचरा न टाकण्याचा फलक सुद्धा लावलेला आहे तरी बेजबाबदार नागरिक या सूचनेला केराची टोपली दाखवत खुलेआम कचरा टाकून परिसर घाण करीत आहे .तरी अशा बेजबाबदार नागरिकावर अंकुश ठेवून परिसर घाण करणाऱ्यांवर ग्रामपंचायत ने कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातून होत आहे,