आळंदी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर
गरीब महिलांचे अल्पदरात स्तन कर्करोगाचे निदान होण्यासाठी रोटरी क्लब निगडीच्या वतीने एन्प्रो इंडस्ट्रीजच्या सहकार्याने आळंदी येथील इंद्रायणी रुग्णालय आणि कॅंसर इंस्टिट्यूटला मॅमोग्राफी मशीन भेट देण्यात आली.
यावेळी अध्यक्ष हरबिंदर सिंग, एन्प्रो इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकृष्णा करकरे, कमलजीत कौर, इंद्रायणी रुग्णालयाचे मुख्य विश्वस्त डॉ संजय देशमुख, सचिव मुकुंद देशपांडे, निगडी क्लबचे सीएसआर डायरेक्टर राकेश सिंघानिया, डॉ. शुभांगी कोठारी, वैद्यकीय संचालक डॉ अमोल मेहता, राणू सिंघानिया,मुकुंद मुळे, रुग्णालयाचे विश्वस्त अनिल पत्की, वैद्यकीय संचालक डॉ राजीव जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. देशमुख म्हणाले, स्त्रीयांमध्ये भारतातील सर्वात सामान्य कर्करोग म्हणजे स्तनाचा कर्करोग आहे. २०२२ मध्ये १,९२,०२० नवीन प्रकरणे नोंदवली गेली. ज्यामध्ये स्त्रियां मधील सर्व नवीन कर्करोगाच्या प्रकरणां पैकी २६.६% समाविष्ट आहेत. हा कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीतही प्रमुख कारण असून या कर्करोगामुळे २०२२ मध्ये ९८,३३७ मृत्यू नोंदवले गेले आहे.
डॉ.कोठारी म्हणाल्या कि,बदलती जीवनशैली, पोषक आहार आणि व्यायामाचा अभाव, हार्मोन्स बिघडतेले संतुलन यामुळे कर्करोगा होण्याचे मुख्य कारण बनले आहे.