सुनील भंडारे पाटील
सध्या ऑनलाईनचा जमाना आहे, सर्वांकडेच वेळ कमी आहे याचा परिणाम वित्त संस्थांवर झाला असून सद्यस्थितीत सुशिक्षित व शैक्षणिक दृष्ट्या अग्रेसर असणारी पिढी आर्थिक व्यवहारांसाठी ऑनलाईन तसेच फायदेशीर व आकर्षक सोयी सुविधासाठी आंतरराष्ट्रीय कृत तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडे वळलेली दिसत आहे,
वेळेचे महत्व जाणवणारी तसेच जलद व्यवहार, करन्सी लेस व्यवहार करण्यासाठी तरुण पिढी आता ऑनलाईन कडे वळलेली आहे, बदलत्या संशोधनामध्ये समाजामध्ये काम करत असणाऱ्या वित्त संस्था यामध्ये आंतरराष्ट्रीय कृत तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडून अतिशय चांगल्या सोयी सुविधा दिल्या जातात, त्याचप्रमाणे सर्व खात्यामधील ठेवीदारांची अतिशय चांगली काळजी घेत असल्याने, तसेच रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नियमावलीच्या अधीन राहून सर्व व्यवहार काटेकोरपणे या बँकांमध्ये केले जातात,
आंतरराष्ट्रीयकृत , राष्ट्रीयकृत बँका कर्जदारांसाठी देखील विविध योजना राबवतात त्याचा फायदा शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक यांना मोठ्या प्रमाणात होतो तसेच नियमाच्या आधीन राहून जलद प्रक्रियेमुळे कर्जदारांना देखील चांगला फायदा होतो, ऑनलाइन सुविधा, एटीएम सुविधा, आरटीजीएस, चेक बुक, क्लिअरिंग, एसएमएस, ऑनलाइन बँकिंग, विविध कर्ज योजना, पैसे भरण्यासाठी एटीएम योजना, अशा तत्पर सेवांमुळे आजची तरुण पिढी तसेच युवक मोठ्या प्रमाणात राष्ट्रीयकृत बँकांकडे वळलेले आहेत, यावरून काळानुसार होणारा बदल आजच्या पिढीने स्वीकारल्याचे चित्र मात्र स्पष्ट होत आहे,