जुन्नर प्रतिनिधी
ग्रामपंचायत व शिक्षण प्रेमी ग्रामस्थ यांनी आकर्षक फुग्याची सजावट करून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या प्रत्येक मुलाचे औक्षण केले व गुलाब पुष्प देवून विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात आले .
या प्रसंगी विद्यालयात शिरोली बु गावचे सरपंच प्रदीपदादा थोरवे , उपसरपंच वैशालीताई थोरवे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल विधाटे , शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सचिन थोरवे , शिक्षणप्रेमी ग्रामस्थ विक्रम थोरवे , दिनकर बोऱ्हाडे , विजय थोरवे , अभिजीत शेरकर , शाळेच्या पर्यवेक्षक अनघा घोडके सर्व शिक्षक वृंद बहुसंख्येने पालक उपस्थित होते अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद हांडे यांनी दिली.
मान्यवरांच्या शुभहस्ते 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले ग्रंथपाल डुंबरे व्ही एम यांनी पुस्तक वाटपाचे नियोजन केले
या प्रसंगी सरपंच प्रदीप शेठ थोरवे यांनी मार्च 2024 विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि सर्व विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या मान्यवरांचे स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख अय्यर यांनी केले व आभार देवकुळे यांनी मानले,