मातृतिर्थ सिंधखेडराजा ते पाचाड रायगड जिजाऊ महा अभिवादन यात्रेचे आयोजन राजमाता जिजाऊ यांचे वंशज यांनी १५ जून ते १७ जून पर्यंत राजे लखुजी जाधवराव यांनी केले होते. यावेळेस पुणे येथे रुद्रांश फाऊंडेशन च्या माध्यमातून महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४ चे आयोजन करण्यात आले होते तसेच पुणे महानगर पालिकेच्या आंबेडकर भवनमध्ये दिनांक१५ जून रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा सन्माननीय अतिथी ज्ञानेश्वर मोळक (माजी अतिरिक्त आयुक्त पुणे महानगर पालिका ) तसेच युनूस पठाण ( विद्यमान उपायुक्त पुणे महानगर पालिका ) यांच्या हस्ते पार पडला आहे.
या वेळी प्रामुख्याने इतिहासामध्ये संशोधन करणाऱ्या तसेच शिंदे समिती नियुक्त मोडीलिपी वाचक तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. कांचनताई कोठावळे यांचा यावेळी विशेष असा सन्मान करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे प्रमुख कार्यवाहक म्हणून जयदेव जाधव ( बुद्ध धम्म व थोर इतिहास अभ्यासक ) हे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी अभिनेत्री कोमल सावंत यांनी केले आहे.