सुनील भंडारे पाटील
सणसवाडी (तालुका शिरूर) येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी निधन झाल्याने संपूर्ण सणसवाडी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे,
सणसवाडी गावच्या विकासामध्ये तसेच लोकांच्या , ग्रामस्थांच्या प्रश्नावर कायम तोडगा काढत सर्व समाजसेवेमध्ये हिरीरीने सहभाग घेणारे पंचक्रोशीत ओळख असणारे दत्तात्रय नामदेव हरगुडे यांच्या आज निधन झाले, काल सणसवाडी मध्ये एका कार्यक्रमासाठी पाई जात असताना भरधाव येणाऱ्या क्रेटा गाडीने त्यांना ठोकर दिल्याने यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली,
दत्ताभाऊंच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर, हरगुडे भाऊबंद, आप्तेष्ट नातेवाईक, सणसवाडी तसेच पंचक्रोशी मधील दुःखाचा डोंगर कोसळला असून ही बातमी समजताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली,सणसवाडी मध्ये अत्यंत मनमिळाऊ जनतेची सेवा करणारा तसेच चांगल्या स्वभावाचा लोकनेता हरपल्याने गावामध्ये सर्वत्र दुःखाचे सावट आहे,