सुनील भंडारे पाटील
धर्मवीर शंभूराजे समाधी स्थळ वढू बुद्रुक (तालुका शिरूर) या ऐतिहासिक धार्मिक स्थळाला जोडलेला कोरेगाव भीमा या तीन किलोमीटर अंतरावर वाहनांचा वेग वाढल्याने लहान मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे, संबंधित मार्गावर अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने गतिरोधक बसवावे अशी मागणी ग्रामस्थांकडून तसेच प्रवाशांकडून होत आहे,
पुणे नगर महामार्ग कोरेगाव भीमा पासून श्रीक्षेत्र वढू बुद्रुक पर्यंत जोडलेल्या या रस्त्याचे नूतनीकरण नुकतेच झाले असून सिमेंटचा चांगला रस्ता बनवण्यात आला आहे, या रस्त्यालगत संपूर्णपणे लोकवस्ती असून प्रवाशांची, शेतकऱ्यांची, विद्यार्थी, तसेच संपूर्ण हिंदुस्तानातून शंभू भक्तांची दाट ये जा असते रस्त्याचे काम नुकतेच झाल्याने दुचाकी ,चारचाकी, मालवाहतूक गाड्या यांच्या वेगावर नियंत्रण राहिले नाही त्यामुळे लहान मोठ्या अपघाता बरोबर गंभीर अपघातही झाले आहेत, कोरेगाव भीमा तसेच वढू बुद्रुक ग्रामपंचायत यांनी गतिरोधक टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी स्वरूपात पत्र दिले आहे, अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांनी तातडीने निर्णय घेऊन संबंधित रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकावीत अशी मागणी ग्रामस्थ तसेच प्रवासी त्याचप्रमाणे रहिवाशी वारंवार करत आहेत,