सुनील भंडारे पाटील
शिरूर हवेलीचे कार्यसम्राट विद्यमान आमदार अशोक बापू पवार यांचे खंदे समर्थक अरविंद भंडारे पाटील यांची नुकतीच शिरूर तालुका सोशल मीडिया उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली,
वढू बुद्रुक येथील स्थानिक रहिवासी असणारे अरविंद भंडारे हे पूर्वीपासून आमदार पवार यांचे जवळचे समर्थक असून भंडारे यांनी शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले आहेत त्यांच्या कामाची पोचपवती म्हणून शरद पवार राष्ट्रवादी पक्षातर्फे त्यांच्या कामाचा गुणगौरव करत तालुक्यामध्ये महत्त्वाची जबाबदारी दिली असून अरविंद भंडारे यांना शिरूर तालुका सोशल मीडिया उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे पत्र नुकतेच देण्यात आले आहे, या निवडीनंतर भंडारे यांनी सांगितले की पक्ष बांधणीसाठी तसेच येणारे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाची छाप वाढवण्याचे काम करणार असल्याचे सांगितले,