कुणाल आवचर राज्यात दुसरा ; ४३ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र
उपक्रमशील मुख्याध्यापक लोखंडे यांचा विशेष सत्कार
आळंदी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर
येथील धानोरे ( ता.खेड ) आदर्श प्राथमिक शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेत धानोरे आदर्श प्राथमिक शाळेचा धमाकेदार निकाल लागला असून प्रशालेचे ४३ मुले शिष्यवृत्ती धारक म्हंणून पात्र ठरले आहेत. तर कुणाल आवचर राज्यात दुसरा आला असल्याचे मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे यांनी सांगितले.
शिक्षणाधिकारी (प्राथ) प्रेरणा संजय नाईकडे, गटशिक्षणाधिकारी प.स.खेड अमोल जंगले, विस्ताराधिकारी जीवन कोकणे, विस्ताराधिकारी प.स. खेड श्रीरंग चिमटे यांनी सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक यांचे मुख्याध्यापक व शिक्षक, अध्यक्ष,उपाध्यक्ष व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती धानोरे, सरपंच,उपसरपंच, सदस्य ग्रामपंचायत धानोरे यांच्या वतीने मुलांचे तसेच परिश्रम घेतलेल्या सर्व शिक्षक, मुख्याध्यापकांचे अभिनंदन करण्यात आले. आळंदी जनहित फाउंडेशनचे वतीने उपक्रमशील मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे यांचे अभिनंदन अध्यक्ष राजेंद्र घुंडरे, कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केले.
शिष्यवृत्ती पात्र मुलांना मार्गदर्शक शिक्षिका सुनीता पाटील / भातकांडे यांनी मार्गदर्शन केले आहे. विशेष म्हणजे पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेने यश मिळवले आहे. धानोरे परिसरात प्रशालेच्या मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी आणि स्थानिक लोक प्रतिनिधी यांनी गुणवंत विद्यार्थी यांचेसह शैक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शकांचे कौतुक केले आहे.
गुणवंत मुलांमध्ये इयत्ता आठवीचे २३ विद्यार्थी आणि इयत्ता पाचवी १९ विद्यार्थी यांचा समावेश आहे.
इयत्ता आठवी गुणवत्ता यादीत २३ विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक कविता आवचर आहेत. गुणवत्ता यादीत १३ विद्यार्थी इयत्ता आठवी मोगरा गट यामध्ये नैतिक नेवारे, वेदांत क्षीरसागर, श्रेया खाडे, श्रुती कुटे, श्रेयशी देडे आर्या गावडे,वेदांत गावडे, वैष्णवी कुडदुलवार, सुमित लिंबापुरे, सृष्टी पठारे, विराज गावडे, ज्ञानेश्वरी वाघमारे, आयुष दाभाडे यांचा समावेश आहे.
मार्गदर्शक पांडुरंग आव्हाड गुणवत्ता यादीत इयत्ता आठवी शरयू ७ विद्यार्थी यामध्ये गौरव हिवाळे, तुकाराम भोसले, सना शेख, अस्मिता तांबे, दिव्या कदम, शिवम मुंढे, सिद्धी थोरवे यांचा समावेश आहे.
इयत्ता आठवी सिंहगड गट मार्गदर्शक रेणुका कोरे गुणवत्ता यादीत पूजा सपकाळ, श्रावणी फुंदे, साक्षी काळे, हेमांगी गायकवाड यांचा समावेश आहे.
इयत्त्ता पाचवी गुणवत्ता यादीतील विद्यार्थी १९ मार्गदर्शक सुनिता पाटील / भातकांडे 12 विद्यार्थी गुणवत्ता यादीत यामध्ये इयत्ता पाचवी अ सूर्यफूल गट पट संख्या ३९ उत्तीर्ण ३६ विद्यार्थी झाले. या निकालात कुणाल आवचर २८८ गुण मिळवत राज्यात राज्यात दुसरा आला. या शिवाय गुणवत्ता यादीत आरुष आढाव, मुकुंद गोडसे, शर्वरी वाबळे, अपेक्षा गाडेकर, श्रावणी गरुड, कावेरी मुंडे, कृष्णा खोंडे, साई थोरवे, श्लोक थोरवे, ओवी गावडे, वेदश्री गावडे, दूर्वा पाठक यांचा समावेश आहे.
मार्गदर्शक शिक्षिका छाया जाचक ७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत तोरणा ब तुकडी ४० पट संख्या यात ३६ उत्तीर्ण झाले. या मध्ये आयशा शेख, सृष्टी पालवे, प्राची मिसाळ, संस्कृती कारले, श्रुतिका सुतार, साईराज काळबांडे, ऋषिकेश घनवट, ऋषिकेश मुंढे यांचा समावेश आहे.