आळंदी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर
वारी खेड आळंदीची ' तालुक्यातील कानाकोपऱ्यातील प्रश्न जाणून घेण्याच्या संकल्पनेतून पंधरा दिवसांची नाविन्यपूर्ण वारीचे श्री.मयूर दौंडकर -आम आदमी युवा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र आणि त्यांचे सहकारी यांच्या वतीनेआयोजन करण्यात आले आहे"
खेड आळंदी संत सहवासाने पुनीत झालेली भूमी असून येथील प्रत्येकाच्या मनामध्ये धार्मिक अधिष्ठान आहे. नुकतेच आळंदी,देहू येथून ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम यांच्या पालख्यांचे प्रस्थान पंढरपूरकडे झालेले आहे.
वारी' खेळ आळंदीची' ही वारी वैविध्यपूर्ण असून तालुक्यातील लोकांपर्यंत वारीच्या निमित्ताने जाऊन 'आप ली वारी आपल्या दारी, या संकल्पनेतून संपूर्ण तालुक्यातील कानाकोपऱ्यातील विविध प्रश्न जाणून घेतले जाणार असून त्या प्रश्नांची भविष्यात सोडवणूक करण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत.
या वारीची सुरुवात भीमाशंकर मंदिरातून दर्शन घेऊन तालुक्यातील पश्चिम भागाकडून सोमवार दिनांक १ जुलै २०२४ पासून सकाळी सात वाजेपासून सुरू झाली आहे.
या वारीच्या माध्यमातून आत्तापर्यंत भीमाशंकर परिसरातील भीमाशंकर, कारकुडी, टोकावडे, भोरगिरी, भिवेवाडी, शिरगाव, भोंबाळे, पाबे, खरोशी , धुवोली, वांजाळे, मंदोशी ,नायफड ,ढेहणे, सुरकुंडी, वाळद, गोरेगाव, आव्हाड, खरोशी, धामणगाव, एकलहरे, शेंदुर्ली, नाणे, ताम्हाणे, चास, मोहकल , कान्हेवाडी, कडधे, बुरशेवाडी, गुंडाळवाडी, दरकवाडी,वाडा, साकुर्डी, काहु, कोयाळी गावांमधून वारीचे मार्गक्रमण झाले असून पुढे तिची वाटचाल चालू आहे
ही वारी पंधरा(१५ दिवस) दिवस चालणार असून सकाळपासून संध्याकाळपर्यंत तालुक्यातील पश्चिम भागाकडून -पूर्व भागाकडे नियोजनाप्रमाणे दररोज नियोजित गावांमध्ये वारी मार्गक्रमण करणार आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात या वारीचे पदार्पण होणार असून तसे नियोजन करण्यात आले आहे.
या वारीच्या माध्यमातून गावामध्ये चावडीवर ,मंदिरात ,वेशीवर, शेतामध्ये, घरामध्ये, लोकांना भेटून संपर्क करून आचार विचारांची देवाणघेवाण करून त्या भागातील लोकांचे, नागरिकांचे प्रश्न समजावून घेतले जाणारे असून ते प्रश्न भविष्यात सोडवण्याची नियोजन करण्यात येणार आहे.
अशा आगळ्यावेगळ्या 'आपली वारी आपल्या दारी, या संकल्पनेवर आधारित असणारी ही नाविन्यपूर्णवारी निश्चितपणे तालुक्यामध्ये चैतन्य निर्माण करणार आहे. लोकांमध्ये जाऊन वारीच्या काळामध्ये लोकांचे प्रश्न समजून घेण्याचा हा पहिलाच प्रयत्न या वारीच्या माध्यमातून होत आहे .या वारीचे आयोजन श्री.मयूर दौंडकर-आम आदमी युवा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र,व त्यांचे सहकारी यांनी केले आहे.
राजकीय महत्त्वकांक्षा असणाऱ्या तालुक्यातीलअनेक नेत्यांनी मोफत पंढरपूर दर्शन यात्रांच्या आयोजनाचा झपाटा लावला आहे. परंतु श्री.मयूर दौडकर यांनी आळंदी येथे माऊलींच्या पंढरपूर प्रस्थान वारीत सहभाग घेऊन तालुक्यातील प्रश्न समजून घेण्याचा संकल्प डोळ्यासमोर ठेवून पंधरा दिवसाची ही आगळीवेगळी वारी आयोजित करून एक चांगला संकल्प लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. अशी आगळीवेगळी वारी तालुक्यात चर्चेचा विषय बनत असून लोकांकडून सहानुभूती/ मोठा प्रतिसाद मिळत आहे आहे. श्री.मयूर दौंडकर सारख्या गरीब शेतकरी कुटुंबातील युवकांनी अशा पद्धतीचे चांगले पाऊल उचलून तालुक्यात चांगला आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.