आळंदी : येथील चर्मकार समाजाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ लक्ष्मण राऊत ( वय ७२ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी ( दि. १५ ) सह्याद्री हॉस्पिटल मध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक केशव राऊत व कृषी अधिकारी अशोक राऊत यांचे ते वडील होत. आळंदी येथील पत्रकार एम.डी.पाखरे यांचे ते मेहुणे होत. त्यांच्या अंत्ययात्रेस शासकीय तसेच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील लाखो शोकाकुल उपस्थित होते.
3/related/default