भोर प्रतिनिधी सुनिल साळवी
रविवार दी 14 रोजी पहाटेच्या सुमारास भोर तालुक्यातील आंबावडे गावातील जेधेवाडी येथील शेतकरी संभाजी दत्तात्रय जेधे यांच्या जनावरांचा गोठा झालेल्या मुसळधार पाऊसामुळे कोसळून त्यामध्ये असणारी एक गाभन म्हैस जागेवरती गत प्राण झाली आहे व इतर पाच- सहा जनावरे गंभीर जखमी झाली आहेत.
सदरील घटनेची माहिती शेतकऱ्याकडून समजताच भोरचे तहसीलदार सचिन पाटील व गावचे तलाठी तसेच सरपंच यांनी सदरील घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला आहे.मागील तिन दिवसांपासून भोर परिसरात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे सदरील जनावरांचा गोठा कोसळून त्या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी शासनाने भरीव अशी मदत तात्काळ त्या शेतकऱ्यास देण्यात यावी अशी मागणी गावामधील शेतकरी वर्गाकडून भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.