पुणे जिल्हा प्रतिनिधी
मुंबई,ज्या पद्धतीने विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ केली. त्याच धर्तीवर एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची सुद्धा मूळ वेतनात पगारवाढ करावी- योगेश केदार शिवसेना प्रवक्ता
त्यावर मुख्यमंत्री महोदयांनी अपर मुख्य सचिवांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आणि लवकरात लवकर याबाबत निर्णय केला जाईल. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वीज कर्मचाऱ्यांचा धर्तीवर पगारात वाढ करणेबाबत चे एक निवेदन शिवसेना प्रवक्ता योगेश केदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून एसटी कर्मचारी आपली पगारवाढ मिळण्यासाठी विविध प्रकारे आंदोलन करत आहे.असे निदर्शनास आले आहे की बाकीच्या महामंडळाच्या तुलनेत एसटी कर्मचारी यांच्या वेतनात खूप मोठया प्रमाणात तफावत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने विद्युत महामंडळ कर्मचाऱ्यांची पगारवाढ केली आहे. मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात तोट्यात गेलेले महामंडळ फायद्यात आले आहे. त्या महामंडळा साठी रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची अपेक्षा देखील एसटीचा कर्मचारी मुख्यमंत्री महोदयांकडून करीत आहेत.तरी आपल्याकडून या कर्मचाऱ्यांचा सुद्धा विचार करण्यात यावा, जसे विद्युत महामंडळा प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा न्याय हा देण्यात यावा.
तसेच लवकरच अधिकारी वर्गांची बैठका लावून हा निर्णय होण्याची शक्यता आहे. आणि मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक निर्णय घेणार आहेत. आसे यावेळी माध्यमांना बोलताना शिवसेना प्रवक्ता योगेश केदार यांनी सांगितले आहे.