एक राखी सैनिकांसाठी शिरोली बुद्रुक मधील विद्यार्थिनींचा रक्षाबंधन निमित्त स्तुत्य उपक्रम

Bharari News
0
जुन्नर प्रतिनिधी सचिन थोरवे 
               जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रुक (ता जुन्नर) विद्यालयांमध्ये राष्ट्रीय हरित सेना , वनराई अंतर्गत इको क्लब , स्काऊड गाईड , RSP विभागा मधील इ 5 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या विदयार्थानी रक्षाबंधना निमित्त सीमेवर लढणाऱ्या भारतीय जवानां साठी 150 राख्या व 80 शुभेच्छापत्रे तयार केले व या सर्व राख्या व शुभेच्छा पत्र 'कोब्रा कॅम्प ' CRPF दलगाव जिल्हा दारंग आसाम , बिपीन हरिभाऊ कांडगे या जवानांच्या नावावर त्यांच्या तुकडीसाठी स्पीड पोस्टाने पोस्ट करण्यात आल्या .
            या सर्व कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय हरित सेना प्रमुख देवकुळे एस व्ही , भालिंगे व्ही एस व स्काऊट गाईड प्रमुख मुंढे आर एस , व  शिंदे आर पी, कवडे एस पी , नलावडे आर के, पादीर पी डी , श्रीम पादीर एस बी,  खेडकर जे जी ,  निधन टी पी , पाटोळे ए एस व RSP विभाग प्रमुख  विरणक एस डी व भौरले एस ए , गायकवाड एस एस तर सांस्कृतीक विभाग प्रमुख अय्यर आर एस व ग्रंथपाल डुंबरे व्ही एम विद्यार्थ्यांना साहित्य पुरवण्याचे काम केले . सर्व कार्यक्रमाची फोटोग्राफी मयूर जगताप व पी पी टी चे काम श्रीम कविता ढेरंगे यांनी केले या सर्व शुभेच्छा पत्रांचे संकलन मोरे एस एच, नलावडे के एन व केदार सर यांनी केले व सर्व पोस्टींग चे काम विद्यालयाचे लिपीक सांगडे सर व सेवक भारमळ मामा व बोभाटे मामा यांनी केले व हा सर्व कार्यक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद हांडे व पर्यवेक्षिका अनघा घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला. शिरोली बु गावचे सरपंच प्रदीप थोरवे यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!