वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथील भीमा नदीमध्ये कुजलेल्या अवस्थेतील पुरुष जातीचा मृतदेह सापडला असून हा मृतदेह पूर्णपणे डीकंपोज झालेला आहे,

वढू बुद्रुक गावाच्या हद्दीमध्ये भीमा नदीच्या काठाला एक मृतदेह तरंगत असल्याचे मच्छीमारांच्या लक्षात आले त्यानंतर ही बातमी पोलीस पाटील यांना समजल्यानंतर वढू बुद्रुकचे पोलीस पाटील जयसिंगराव भंडारे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन यांना संबंधित मृतदेहाची माहिती दिल्यानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करण्यात आला, संबंधित मृतदेह पुरुष जातीच असून पूर्णपणे कुजलेला अवस्थेत आहे, शरीरावर राखाडी रंगाचा टी-शर्ट आहे अंदाजे 30 ते 35 वयोगटातील हा मृतदेह असून अंगावरील कातडी गेलेली आहे, मृतदेह पूर्णपणे डीकंपोज झालेला असून संबंधित जागेवरच शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी यांनी उत्तरिय तपासणी केली, व संबंधित मृतदेहाला शासकीय जागेमध्ये मूठमाती देण्यात आली, पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहे,