सुनील भंडारे पाटील
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजायला सुरुवात झालेली असतानाच शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ भाजपमध्ये गटबाजी असल्याचे दिसून येत आहे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी पक्षातील किसान मोर्चाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लागले आहेत
या बॅनर वरती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देवेंद्र फडणवीस तसेच जिल्ह्यातील, राज्यातील पदाधिकाऱ्यांसह स्थानिक गाव पातळीवरील पदाधिकाऱ्यांचे फोटो आहेत. मात्र या सर्व बॅनर वरती भाजपकडून संभाव्य उमेदवार असलेल्या नेत्याचाच फोटो गायब असल्याने चर्चेला उधाण आले आहे.
या वाढदिवसाच्या लागलेल्या बॅनर मुळे भाजपमध्ये गटबाजी असल्याचे उघड झाले आहे, एकीकडे तालुक्यातील काही भाजप पदाधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी अजितदादा विरोधात भाजपच्या बैठकीत विरोध केल्याचे समोर आलेले असताना आता भाजपमध्येच देखील गटबाजी दिसून येत असल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या गटबाजीचा फटका भाजप उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिरूर हवेली विधानसभा निवडणुकीसाठी बाशिंग बांधून बोहल्यावर उभे असणाऱ्या उमेदवाराला मात्र ही भविष्यातील मोठी चेतावणी असून निश्चितच निवडणूक मध्ये फटका बसणार असल्याचे चित्र मात्र उघड होत आहे,