सुनील भंडारे पाटील
शिक्रापूर (तालुका शिरूर) येथे अल्पवयीन तीन वर्षाच्या बाल चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे पडसाद अजूनही परिसरात उमटत असून संतापाची लाट उसळत आहे, या घटनेविषयी माहिती लपवण्याचे तसेच आरोपी अल्पवयीन माहिती सांगून वेगळे वळण देण्याचा प्रयत्न चालू असून या घटनेतून पुरावे नष्ट करण्याची दाट शक्यता वाटत आहे,
या घटनेनंतर पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी समाजातून अनेक संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त करत कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी लेखी स्वरूपात निवेदने देण्यात आली, परंतु आरोपी विषयी बरीचशी माहिती मीडियाला प्रसिद्ध करण्यापासून रोखण्यात आले, त्याचप्रमाणे आरोपी राहत असलेला पत्ता प्रसिद्ध गुन्हेगाराची बिल्डिंग बदनामी होऊ नये म्हणून पत्ता लपवण्यात आला, ही घटना जर अशा व्यक्तींच्या संबंधात घडली असती तर त्यांनी ही माहिती लपवली असती का? असा प्रश्न समाजातून विचारला जात आहे,
आरोपी विषयी माहिती लपवण्यासाठी मीडियावर जर दबाव येऊ शकतो तर पीडित कुटुंबीय त्याचप्रमाणे या घटनेबद्दल होणारा तपास तसेच ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांच्यावर दबाव येणार नाही का? घटनेसंबंधीचे अहवाल सत्य समोर येईल का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने आंदोलकांनी सतर्क राहून लक्ष देणे गरजेचे आहे, घटनेसंबंधी संपूर्ण माहिती जनतेला अवगत आहे, प्रकरण दडपण्यासाठी अनेक शक्ती सक्रिय झाले आहेत, घटने संदर्भात अहवाल बदलल्यास संतापलेली जनता अशांना चोप दिल्या शिवाय राहणार नाही, अशी चर्चा जनतेत चालू आहे,