शिक्रापूर (तालुका शिरूर) येथे एका अल्पवयीन तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे, हा बलात्कार करणारा एक मुस्लिम समाजातील 13 ते 14 वर्षाचा मुलगा असून याबाबत पीडित मुलीच्या आई-वडिलांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ आज विश्व हिंदू परिषद-बजरंग दल शिक्रापूर च्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या वतीने आरोपीस योग्य ती कार्यवाही करण्यासाठी संघटनेच्या वतीने प्रशासनाला पत्रक देऊन शांततेत मोर्चा काढुन घडलेल्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी ,पंचक्रोशीतील हिंदू बांधव व तसेच ग्रामस्थ उपस्थित होते . अल्पवयीन आरोपीवर कठोरात्मक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली,