संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सुवर्ण महोत्सवी वर्ष
आळंदी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर
श्री संत ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी संप्रदायाचे रचीयाता आहेत. सन २०२४ - २५ हे माऊलींचे ७५० वे वर्ष असून आळंदी देवस्थाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सवाचे सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष (७५०) २०२४-२५ साजरे करणार आहे. या निमित्त सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष (७५०) २०२४ - २५ बोधचिन्ह तयार केले असून या बोधचिन्हाचे अनावरण राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन् यांचे हस्ते राजभवन, मुंबई येथे झाले.
यावेळी प्रधान सचिव प्रवीण दराडे यांचे आळंदी देवस्थानचे वतीने स्वागत करण्यात आले. या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ॲड राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त श्री योगी निरंजन नाथसाहेब, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, उमेश बागडे उपस्थित होते.
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन् यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनास येण्याची इच्छा व्यक्त करत लवकरच दर्शनास दौरा होणार आहे. प्रमुख विश्वस्त ॲड राजेंद्र उमाप विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांनी संस्थानच्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन् यांना दिली.