दि.21/09/24 रोजी राञी 19.46.वाजण्याच्या सुमारास केसनंद भागातून मुलगी नाव.शर्वरी वैजनाथ कदम ,वय 12.वर्ष राहणार केसनंद शेतीच्या राहत्या घरातून निघून गेली आहे बाबत पोलीस स्टेशनला 22 .40. वाजता माहिती मिळाल्याने सदर बाब मा. वरिष्ठांना कळविले असता लागलीच लोणीकंद पोलीस स्टेशनचे तीन पथके तयार करून त्यांना विविध मार्गाने रवाना करून शोध कार्य सुरू केले,
तपास पथकासह लोणीकंद पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांनी मुलीचा केसनंद भागात कॅमेर्याव्दरे शोध घेऊन शेवटचा कॅमेरा पाहून शिवालयिर मंदिर केसनंद येथे मिळाली आहे .मुलीला अभ्यास करण्याच्या कारणावरून तिच्या आईने रागावल्याने ती रागाच्या भरामध्ये घरातून निघून गेलेली होती बाबत सांगितलेली आहे.मुलगी सुखरूप आहे तिला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे अवघ्या चार तासात लोणीकंद पोलिसांनी मुलीचा शोध लावल्यामुळे नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक करण्यात आले, सदरची कामगिरी श्री हिम्मत जाधव उपायुक्त परिमंडळ 4 श्रीमती प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग पंडित रंजितवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पोलीस स्टेशन रवींद्र गोडसे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम सुरवसे पोलीस उपनिरीक्षक, संजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक पो. ना.जाधव,पो.ना.फरादे पो.शी.गोपळ पो शी सपुरे ,पो शी रोकडे ,पो शी,शिवले ,पो शी गायकवाड, पो शीआसावले,पो शी सालके,पो शी ढवळे,पो शी विखे,पो शी मांदळे,यांनी केली आहे ,
केसनंद गावातून डिपार्टमेंट बरोबर मुलीला शोधण्यासाठी मदत केसनंद गावच्या महिला दक्षता समितीच्या अध्यक्ष सौ अलकाताई सोनवणे ( हरगुडे ) तसेच कौशल्य वाघमारे सुजित नाना काळे 12 ते साडेबाराच्या दरम्यान ग्रामपंचायत उघडून कॅमेरा पाहून मदत करणारे सागर शिंदे यांचे सर्वांचे मनापासून आभार,