आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेली असताना शिरूर हवेलीच्या राजकारणामध्ये झपाट्याने बदल घडत आहेत, या मतदारसंघात महाविकास आघाडी कडून उमेदवारी फायनल झाल्यानंतर अनेक बदल घडू लागले आहेत,
मोठी मतदार संख्या असणाऱ्या वाघोली गावांमधील इच्छुक असणारे उमेदवार माऊली आबा कटके यांनी आज महाविकास आघाडी मधील शिवसेना उद्धव ठाकरे गटाला रामराम ठोकत राष्ट्रवादी अजितदादा गटामध्ये जाहीर प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे,
शिरूर हवेली विधानसभा मतदार संघामध्ये आमदारकीची निवडणूक जोरदार लढत होणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे, महाविकास आघाडी कडून विद्यमान आमदार अशोक बापू पवार यांची उमेदवारी फायनल झाल्यानंतर वाघोली मधून इच्छुक असणारे उमेदवार माऊली आबा कटके यांना डावलण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत होती, कटके यांच्याकडून गेल्या अनेक महिन्यांपासून निवडणुकीची जोरदार तयारी चालू असताना पक्षाकडून तिकीट दिले जात नसल्याने, त्यांनी अचानक न्यूटन घेत राष्ट्रवादी अजितदादा गट यामध्ये आज अनेक कार्यकर्त्यांसमवेत प्रत्यक्ष अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक मध्ये चुरशीची लढत होणार अशी चिन्हे दिसत आहेत, कटके यांच्या पक्षप्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे,
संतोष हगवणे, सुजित चौधरी, गणेश हगवणे, शिवाजी चौधरी, प्रतीक चौधरी, रवींद्र शेलार, विनायक गायकवाड नाना गायकवाड, व मोठ्या संख्येने इतर कार्यकर्ते उपस्थित होते,