सुनील भंडारे पाटील
पुणे नगर महामार्गावर लोणीकंद तसेच भावडी (तालुका हवेली) मधील खडी क्रशर वाहतूक ढंपरचा अनेक वर्षापासून धुमाकूळ पाहायला मिळत आहे बेशिस्त वाहन चालक, अवैध वाहतूक याचा नागरिकांना खूप त्रास असून अशा डंपरमुळे अनेक अपघात घडलेत अनेकांचा जीव घेतला त्याचप्रमाणे पुणे नगर महामार्गावर पूर्णपणे धुळीचे साम्राज्य आहे, याला आळा बसावा म्हणून पुणे वाहतूक शाखेकडून ढंपर चालकांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या,
खडी वाहतूक ढंपर चालकांच्या मनमानी कारभार या भागात अनेक दिवसापासून चालू आहे, या चालकांना तसेच त्यांच्या मालकांना व खडी क्रशर यंत्रणेला कुठल्याच प्रकारचा धाक राहिलेला नाही यांनी अनेकांचे जीव घेतलेत, याच्याशी संबंधित असलेल्या शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एकदा तरी पेरणे ते वाघोली असा टू व्हीलर प्रवास करावा मग यांना समजेल किती त्रास आहे ते? अशी जनतेतून मागणी होत आहे, बेशिस्त खडी क्रशर डंपर चालकांमुळे अनेक अपघात झालेत, तसेच संबंधित ठिकाणी पूर्णपणे धुळीचे साम्राज्य आहे दुचाकी चालकांचे डोळे धुळीने पूर्णपणे जाम होत आहेत नागरिकांना प्रवास करणे मुश्किल झाले आहे, त्यामुळे अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांना नेमके पाठबळ कोणाचे? असा प्रश्न जनतेतून वारंवार उपस्थित केला जात आहे,
या परिस्थितीला आळा बसावा म्हणून पुणे वाहतूक विभागामार्फत अशा वाहतूकदारावर आता बंधने घालण्यात आली असून त्यांच्या वाहतुकीसाठी देखील 24 तासातील ठराविक वेळ देण्यात आली आहे, शिवाय अवजड डंपर मुळे कोणाचा जीव गेला तर त्या चालकांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार अशा अनेक सूचना आज लोणीकंद येथे वाहतूक शाखे मार्फत देण्यात आल्या यावेळी मृत्यूचा सापळा असणारा सुरभी पॉईंट वरती एपीआय गजानन जाधव यांनी सर्व डंपर चालक यांना योग्य ती समज दिलेली आहे, याप्रसंगी लोणीकंद पोलीस स्टेशनचे एपीआय वंजारी मॅडम व इतर स्टाफ व सर्व डंपर चालक उपस्थित होते,