श्री गुरुदेव दत्त प्रतिष्ठान, राधेश्वरी नगर बकोरी रोड, वाघोली (तालुका हवेली) पुणे यांच्या वतीने दरवर्षा प्रमाणे श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. सप्ताह पर्वात श्रीगुरुचरित्र सामुदायिक पारायण, प्रवचन, कीर्तन, भजन असे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
सामुदायिक श्रीगुरुचरित्र पारायणात राधेश्वरीनगरीतील व परिसारातील १२५ भाविकांनी सहभाग नोंदविला होता. ह.भ.प. मुरलिधर महाराज मगर याच्या किर्तन सेवेतुन श्री गुरुदेवदत्त महाराजांचा जन्मोउत्सव साजरा करण्यात आला. सांगतेच्या दिवशी अतिशय उत्साहाच्या व भक्तिमय वातावरणात श्री स्वामी समर्थ व श्री गुरुदेवदत्ताची पूर्ण राधेश्वरीनगर मध्ये पालखी मिरवणुक काढण्यात आली,
त्यानंतर ह.भ.प आबासाहेब गोडसे महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली . व ३३०० ते ३५०० भाविकांनी या किर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला .या सर्व कार्यक्रमाला मृदुगांचार्य ह .भ.प. योगेश महाराज सुर्वे आणि कर्तनसाथ व गायनाचार्य, विद्यार्थी जीवन, दर्शन वारकरी शिक्षण संस्था आळंदी पुणे यांनी साथ दिली.
या सात दिवसाच्या हरिनाम सप्ताह मध्ये सामाजिक ,राजकीय व व्यावसायिक अशा वेगवेगळे मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली त्यामध्ये सर्व मान्यवारांचे श्री गुरुदेवदत्त प्रतिष्ठान तर्फे आभार व्यक्त करण्यात आले मान्यवारांनी राधेश्वरी नगरी ही पुण्य भुमी आहे कारण येथे श्री गुरुदेव दत्त , श्री विष्णु देवांचे , श्री संत तुकाराम महाराज व आपले आराध्य दैवत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची स्मारके या भुमी मध्ये आहेत अशा या पुण्यभुमी मध्ये आम्हाला येण्याचे भाग्य लाभले हेच आमचे पुण्यकर्म असे प्रत्येक मान्यवरांनी सांगितले.अशा या मंगलमय सोहळ्याची सांगता अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडली.