कुरण येथील जय हिंद इंटरनॅशनल स्कूल वार्षिक स्नेहसंमेलनात पावनखिंड कार्यक्रमाने सांगता

Bharari News
0
जुन्नर प्रतिनिधी सचिन थोरवे 
               जयहिंद इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे ५ वे वार्षिक स्नेहसंमेलन 'अभिनव 2024' मोठ्या उत्साहात पार पडले, या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून सौ अनुपमा पाटे, संस्थेचे अध्यक्ष श्री जितेंद्र गुंजाळ, संचालिका अंजली गुंजाळ, इंदुमती गुंजाळ, शुभांगी गुंजाळ, CEO दत्तात्रय गल्हे उपस्थित होते, 

 कार्यक्रमाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडले विद्यार्थ्यांनी अनेक विविध गुणदर्शन सादरिकरण केले. विद्यार्थ्यांनी कला सादर केल्या सदर कार्यक्रमांमध्ये विविध वेशभूषा, रंगकाम याचा समावेश करण्यात आला होता, देशभक्तीपर गीते, कोळीगीत, पाश्चात्य संगीत, नाटक अशा विविध गुणांनी कार्यक्रमाला शोभा आली. सदर प्रकारचे कार्यक्रम हे सह शैक्षणिक उपक्रमात येत असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात, अशी माहिती स्कूलचे प्रा डॉ किरण पैठणकर यांनी दिली.  

     वार्षिक स्नेहसंमेलनाचे पाचवे वर्ष असून यावेळी इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर करत असताना उपस्थित पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. हे गीत बसवण्यासाठी इयत्ता तिसरीच्या क्लास टीचर राधिका बोऱ्हाडे मॅडम त्याचप्रमाणे प्रिन्सिपल डॉक्टर किरण पैठणकर यांनी विशेष मेहनत घेतली .

  संस्थेचे अध्यक्ष कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या, प्रा किरण पैठणकर यांनी सर्व शिक्षकवृंद व उपस्थित पालक वर्गाचे आभार मानले. तसेच कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांना मेजवानी ही देण्यात आली व कार्यक्रम संपन्न झाला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!