श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालय वाघोली च्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्पर्धेमध्ये घवघावित असे यश संपादन केले.
किक बॉक्सिंग ,रेसलिंग व स्विमिंग या स्पर्धा नुकत्याच महाराष्ट्र राज्य व विद्यापीठ पातळीवर पार पडल्या यामध्ये लोणीकंद (तालुका हवेली) येथील श्री रामचंद्र महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतीक कोकरे यांनी किक बॉक्सिंग मध्ये गोल्ड मेडल व रेसलिंग आणि स्विमिंग मध्ये मध्ये शंभूराजे देशमुख व ऋषिकेश हरगुडे यांनी सिल्वर मेडल मिळवून श्री रामचंद्र अभियांत्रिक महाविद्यालयाचे नाव राज्यभर केले,
या विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशामध्ये संस्थेचे संस्थापक सचिव शंकर (काका) रामचंद्र भुमकर व तसेच मार्गदर्शक क्रीडा संचालिका डॉ. सुषमा तायडे यांचा मोलाचा वाटा असून या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करताना शंकर (काका) रामचंद्र भुमकर यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच त्यांनी प्रतीक कोकरे हा या विजयानंतर आता राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा खेळणार असून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन त्याला लागणारे सुविधा या कॉलेज तर्फे देण्याचे क्रीडा संचालिका डॉ . सुषमा तायडे यांना सांगितले,
त्याचप्रमाणे इतर विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये प्रगती करून महाविद्यालयाचे नाव मोठे करावे असे आव्हान विद्यार्थ्यांना केले व लागणारी मदत ही शिक्षक वर्गाने करावी असे सांगितले आहे या कार्यक्रमास संस्थेचे खजिनदार उद्धव (आप्पा )रामचंद्र भूमकर, प्राचार्य डॉ. अविनाश देसाई, सिद्धांत शंकर भूमकर तसेच लेखापाल अनिल जमदाडे.सर्व विभाग प्रमुखर प्रा. दिपाली होदाडे, डॉ वैशाली तुराई , प्रा. विकास गायकवाड, सिराज पटेल, महादेव गोडसे असे अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते,