पाहुण्यांचे मुलांनी व परदेशी पाहुण्यांनी स्वागत गीत म्हणून स्वागत केले
आव्हाळवाडी (तालुका हवेली) येथील माहेर संस्थेमध्ये 28 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मुलांनी आपल्या विविध नृत्यांनी पाहुण्यांचे मन हे प्रसन्न केले आलेल्या पाहुण्यांचे हस्ते वृक्षांना पाणी देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली,
कार्यक्रमाला उपस्थित मनीषाताई कटके, यांचा सन्मान आदरणीय सिस्टर लुसीयांच्या हस्ते करण्यात आले
आलेल्या सर्व पाहुण्यांची सिस्टर लुसी कुरियन यांनी माहेरची शॉल सह श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मनीषाताई कटके यांनी त्यांच्या मनोगतातून माहेरच्या कार्याचे कौतुक केले व माहेरला कुठल्याही कामाची गरज भासल्यास आम्ही माहेर सोबत सदैव आहे असे त्यांनी आश्वासन दिले व त्यांनी माहेरचे व आदरणीय दीदी यांचे कामाचे कौतुक केले,
सर्व पाहुण्यांचे माहेरच्या मुलांनी ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले व नृत्य सादर करून माहेरच्या मुलांनी सर्व पाहुण्यांचे मन हे जिंकले. आमदार बापूसाहेब पठारे यांनी माहेरला आश्वासन दिले की शासनाकडून जी कुठली मदत माहेरला लागल ती मी मिळवून देण्याचा प्रयत्न करेल व यापुढे माहेरला कुठलीही अडचण आल्यास मी सदैव तत्पर असेल व आदरणीय दीदी यांना त्यांनी आश्वासन दिले की आपण मुंबईला जाऊन आपण आपल्या माहेरचे कार्य मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवून माहेरला शासनामार्फत जी मदत मिळेल ती मिळवून देण्याचा प्रयत्न करू. व माहेर मध्ये काम करत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे व गृहमातांचे व रथसारथी यांचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उपस्थिती मध्ये आ.बापूसाहेब पठारे ,प्रकाश धोका सर अजय राऊत ,अर्चना राऊत (बालकल्याण समिती क्रमांक 1 सदस्य),हेलन दीदी,निकोला दीदी,शशिकांत गोरे,पत्रकार सोमनाथ आव्हाळे,पत्रकार जितेंद्र आव्हाळे, पत्रकार नितीन शिंदे,जयंत पवार,स्टॅन्लीसर कर्नल,बालकल्याण समितीच्या सहाय्यक पदाधिकारी 1 विद्या पाटील बालकल्याण समितीच्या सहायक पदाधिकारी 2 अर्चना राऊत बालकल्याण समिती 1 चे सदस्य आनंद शिंदे,विजय साळवे सर,शामा भोसले सामाजिक कार्यकर्ता,बॅटिस्ट मोराईस कोल्हापूर,मनीषा माऊली आबा कटके,गणेश चव्हाण मोठ्या संखेने पंच क्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होतें.सूत्रसंचालन प्रसिध्द निवेदक रमेश दुतोंडे प्रास्ताविक अध्यक्षा हिराबेगम मुल्ला यांनी तर आभार प्रदर्शन विजय तवर यांनी केले.