सुनील भंडारे पाटील
धर्मवीर शंभूराजे समाधी स्थळ श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथील पोलीस पाटील जयसिंग भंडारे यांचा पोलीस पाटील क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस खात्याच्या वतीने सन्मान करण्यात आला ,
बारामती येथे पुणे ग्रामीण पोलीस विभागाचे वतीने पोलीस पाटील मेळाव्यात उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून कामगिरी बजावल्याबद्दल पोलीस प्रशासनाच्या वतीने काही गावांमधील पोलीस पाटलांचा सन्मान करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश साहेब यांच्या शुभहस्ते जयसिंग भंडारी पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे ,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार , बाळासाहेब शिंदे पाटील व इतर पोलीस अधिकारी तसेच जिल्ह्यातील पोलीस पाटील उपस्थित होते. पुणे ग्रामीण पोलीस यांच्यावतीने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता,