वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयाचे मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे,
नुकत्याच पार पडलेल्या मंथन राज्यस्तरीय परीक्षा 2025 मध्ये शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयाने केंद्र जिल्हा आणि राज्यस्तरावर उत्तुंग असे यश संपादन केलेले आहे.
इयत्ता पाचवी मधील विद्यार्थिनी समीक्षा गणेश भंडारे हिने 300 पैकी 284 गुण मिळवून राज्यात आठवा व जिल्ह्यात तिसरा क्रमांक क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर स्वराली दादासाहेब भंडारे आणि आलिया शमशुद्दीन हवलदार यांनी 300 पैकी 268 गुण मिळवून केंद्रात पहिला, राज्यात 16 वा,जिल्ह्यात अकरावा क्रमांक पटकवला तर
ईश्वरी संतोष भोगे, वेदिका गणेश वाडेकर , श्रेया संदीप शिवले यांनी 300 पैकी 264 गुण मिळवून केंद्रात दुसरा , राज्यात अठरावा क्रमांक आणि जिल्ह्यात 13 वा स्वरा सुरेश भंडारे आणि जयेश संतोष गुंडाळ 300 पैकी 264 गुण केंद्रात तिसरा, राज्यात 20 वा आणि जिल्ह्यात पंधरावा क्रमांक पटकावला. त्याचबरोबर इयत्ता सहावी मधील अदिती अरुण भंडारे 212/300
केंद्रात पहिला, जिल्ह्यात 35 वा आणि राज्यात 40 वा क्रमांक पटकावला.तसेच इयत्ता सातवीमधील
नयन खंडू ढगे 214/300 केंद्रात पहिला, जिल्ह्यात 32 वा आणि राज्यात 39 वा तर अंजली प्रमोद भगत 158/300 केंद्रात दुसरा, जिल्ह्यात,60वा आणि राज्यात 67 वा क्रमांक पटकावला. वरील इयत्ता पाचवी व सहावी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे श्री शिंदे हरिष कचर सर आणि इयत्ता सातवी च्या विद्यार्थ्यांना श्रीमती काकडे सुनंदा दगडू मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक संस्था प्रतिनिधी , ग्रामस्थ , विद्यालयाचे मुख्याध्यापक चव्हाण एकनाथ शंकरराव यांनी केले त्याचबरोबर कुरकुटे विलास जयवंतराव सर आणि भंडारे सोमनाथ बबन सर व विद्यालयातील इतर शिक्षक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.