शिरूर तालुका प्रतिनिधी
निमगाव म्हाळुंगी (तालुका शिरूर) मध्ये शिवराज्य प्रतिष्ठाण आणि निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने सरपंच बापूसाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या भागात हिंदू पर्यटकांवर जो दहशतवादी हल्ला झाला
त्या हल्ल्यात आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला त्यांना श्रद्धांजली वाहण्या साठी आणि दहशतवाद्याना शिक्षा व्हावी यासाठी सदर रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी दिलीप चव्हाण, दादासाहेब घोरपडे,श्रीमती तान्हूबाई चव्हाण,आशाताई कुंभार,स्वातीताई दोरगे, शिवराज पवार, आर्यन चव्हाण, भूषण दौंडकर, आदित्य कुटे,प्रणित कांबळे, संस्कार महाडिक, युवराज चव्हाण, प्रेम लोखंडे,
आदर्श गायकवाड, शौर्य दोरगे, शंभू चव्हाण, राजकुमार कांबळे, साक्षी कुंभार, हर्षदा कुंभार,अनुष्का घोरपडे, प्रांजल दोरगे, तनिष्का घोरपडे, स्वरा सूर्यवंशी, श्रेया सूर्यवंशी यांच्यासह अनेक ग्रामस्थ सदर रॅली मध्ये सहभागी झाले होते.
हिंदू पर्यटकांवरती झालेला हल्ला हा अंत्यत क्रूर पणे असून धर्माच्या नावाखाली त्यांना मारले गेले हे अतिशय निंदनीय आहे. बरेच पर्यटक या हल्ल्या मध्ये जखमी झाले आहेत. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे.
सरकारने लवकरात लवकर त्या दहशतवाद्यांना फाशी द्यावी म्हणजे आपल्या हिंदू पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या हिंदू पर्यटकांच्या आत्म्यास शांती मिळून मृत्युमुखी पडलेल्या हिंदू पर्यटकांना तीच खरी श्रद्धांजली असेल असे मत निमगाव म्हाळुंगी चे सरपंच तथा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब काळे यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप चव्हाण यांनी केले असून आशाताई कुंभार यांनी सहभागी झालेल्या देशभक्तांचे आभार मानले.